इस्लामपूर / प्रतिनिधी
नगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत गोंधळाची पंरपरा आज ही कायम राहिली. भुयारी गटार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून ही टेंडर अजून ही निघाले नाही. प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादी विकासाच्या आड येत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीचा निषेध करत विकास आघाडी व शिवसेना नगरसेवकांनी काळ्या फिती लावून सभागृह सोडले.
येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. तर सभा त्याग केल्यानंतर विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकानी मुख्याध्यिकारी दालनासमोर ठिय्या मारला.