जानेवारीत 1.40 लाख कोटी जीएसटी जमा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जानेवारी महिन्यात जीएसटी करसंकलनाचा विक्रम झाला आहे. जानेवारीत आतापर्यतचे उच्चांकी जीएसटी करसंकलन झाले आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीसएटी कर संकलन 1.40 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या जानेवारीत जीएसटी कर संकलनात 15 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. जीएसटी कर संकलनाने 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची जानेवारी हा सलग चौथा महिना आहे.
जानेवारीमध्ये जीएसटीचे एकूण संकलन 1 लाख 40 हजार 986 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा केल्यामुळे हे शक्मय झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, सलग सातव्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. यापूर्वी, एप्रिल 2021 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख 39 हजार 708 कोटी रुपये होते. तर डिसेंबर 2021 मध्ये ते 1.29 लाख कोटी रुपये होते.
वस्तू आणि सेवा कर संकलनाने जानेवारी, 2022 मध्ये 1.40 कोटी रुपयांची विक्रमी पातळी गाठल्यामुळे अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसत असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर करतानाच त्यांनी आनंद व्यक्त करत जीएसटी व्यवस्थेत लक्षणीय प्रगती झाली असली तरी अजूनही काही आव्हाने शिल्लक असल्याचेही नमूद केले.
चढत्या आलेखामुळे अर्थव्यवस्था बळकट
31 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण जीएसटी कराचा महसूल 1 लाख 38 हजार 394 कोटी रुपये इतका झाला आहे. यामध्ये सीजीएसटी 24 हजार 674 कोटी रुपये, एसजीएसटी 32 हजार 016 कोटी रुपये, आयजीएसटी 72 हजार 030 कोटी रुपये (संकलित केलेल्या 581 कोटी रुपयांसह, वस्तूंच्या आयातीवर) आणि उपकर 9,674 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 517 कोटींसह) असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. अर्थसंकल्प सादरीकरण दिवसाच्या पूर्वसंध्येला जीएसटी संकलनात पुन्हा एकदा अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जानेवारीमधील 1.41 लाख कोटी रुपयांच्या करसंकलनामुळे 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अभ्यासात उच्च परंतु स्थिर जीसएटी संकलनाची अपेक्षा आहे.