साहित्य : पकोडासाठीः 1 वाटी शेवगा पाला, पाऊण वाटी बेसन, 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळदपूड, पाव चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा ओवा, पाव चमचा हिंग, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी, कढीसाठीः 1 वाटी दही, पाव वाटी बेसन, अर्धा चमचा हळदपूड, चवीपुरते मीठ, तडक्यासाठीः 1 चमचा तूप अथवा तेल, 1 चमचा मोहरी, 1 लाल सुकी मिरची, 1 इंच दालचिनी तुकडा, 4 कढीपत्ता पाने, सजावटीसाठी कोथिंबीर
कृती : शेवग्याचा पाला स्वच्छ करून बारीक चिरावा. पकोडासाठी दिलेले साहित्य, शेवगा पाला आणि थोडेसे पाणी मिक्स करून गोळा बनवावा. त्याचे पकोडा बनवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. कढीसाठी पॅनमध्ये दही ओतून त्यात इतर साहित्य मिक्स करून मंद आचेवर उकळी काढावी. तडक्यासाठी गरम तुपात मोहरी तडतडावी. नंतर सुकी मिरची, दालचिनी आणि कढीपत्ता टाकावा. तयार पकोडा कढीमध्ये घालावे. वरून तडका आणि कोथिंबीरीने सजवून तयार कढी मूगडाळ खिचडीसोबत द्या.