साखर वर्ष 2021 साठीचा इक्राचा अंदाज : 3.05 टन अपेक्षीत
वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील ऊसाच्या उपलब्धतेच्या कारणामुळे ऑक्टोबरपासून सुरु होणाऱया साखर वर्ष 2021 च्या कालावधीत देशातील साखर उत्पादन वेग घेणार असल्याची माहिती आहे.
सदर कालावधीत देशामध्ये साखर उत्पादन 12 टक्क्मयांनी वाढून 3.05 कोटी टनावर पोहोचण्याचे संकेत इक्राकडून एका अहवालातून व्यक्त करण्यात आले आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या उत्पादनाच्या जोरावर साखर वर्ष 2021 मध्ये साखर उत्पादनात तेजी येणार असून मागील वर्षात काही कारणामुळे उत्पादन प्रभावीत झाले होते. इक्राच्या माहितीनुसार 2.5 कोटी टनाची विक्री आणि 50 ते 55 लाख टन निर्यातीसाठी विचार करण्यात आल्यानंतर साखर वर्ष 2020 मधील प्रमुख साठा 1.1 ते 1.15 कोटीवर राहणार असल्याची शक्मयता आहे.
यासोबत साखर वर्ष 2021 मध्ये जादाच्या साखर उत्पादनाच्या कारणामुळे देशातील साखरेची उपलब्धता जवळपास 4.2 कोटी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादन वार्षिक पातळीवर 64 टक्क्मयांनी वधारुन 1.01 कोटी टन आणि कर्नाटकात हा टक्का 26 ने वाढून 2021 मध्ये जवळपास 43 लाख टनपर्यंत पोहचेल.