नीरज पांडे यांचा चित्रपट
अभिनेता अजय देवगणने स्वतःच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. अजय लवकरच एका माइथोलॉजिकल ड्रामामध्ये दिसून येणार आहे. यासंबंधीची माहिती अजयनेच सोशल मीडियावर दिली आहे. नीरज पांडेसोबत लवकरच एका चित्रपटाला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे अजयने म्हटले आहे.
या चित्रपटाची कहाणी इतिहासातील प्रसिद्ध राजनीतिज्ञ चाणक्य यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘चाणक्य’ हेच ठेवण्यात आल्याचे मानले जाते, परंतु निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण लांबणीवर पडले होते असे नीरज पांडे यांनी 2020 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते.
अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘दृश्यम 2’ हा चित्रपटही पुढील काळात झळकणार आहे. पुढील वर्षी त्याचा ‘मैदान’ हा चित्रट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर अजय देवगण ‘भोला’ या चित्रपटाची निर्मिती करत असून हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.