बेळगाव : अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एवायएम बी अनगोळ संघाने एसजी स्पोर्ट्स व प्रथमेश मोरे संघाला एमपी बॉईजजने सीसीबी इलेव्हन संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. इजाज कुरेशी, सुमीत धोंगडी, स्वयंम अअप्पण्णावर, अक्षय पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पाfहल्या सामन्यात प्रथमेश मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 गडी बाद 139 धावा केल्या. त्यात इजाज कुरेशीने 52, नितीन माटुंगेने 35, कृष्णा सातपुतेने 24, चुन्नी गोयलने 19 धावा केल्या. फँकोतर्फे आरबाज इनामदारने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फँको संघाने 10 षटकात 8 गडी बाद 95 धावा केल्या. त्यात साकिब तिगडीने 34, अरबाज इनामदारने 29 धावा केल्या. प्रथमेश मोरे संघातर्फे कृष्णा सातपुतेने 2 गडी बाद केले. दुसर्या सामन्यात एसजी स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 गडी बाद 85 धावा केल्या. त्यात सुमंथ कोहलीने 30, सुनील नायडूने 19, संतोष बडीगेरने 18 धावा केल्या. एवायएम बी तर्फे संकेत, अक्षर व सत्यंम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम बी अनगोळने 4.4 षटकात 88 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात सुमंथ धोंगडेने 34, अमित नाईकने नाबाद 27 तर प्रथमेश एम. ने 24 धावा केल्या.
तिसर्या सामन्यात सीसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात कयुम पीरजादेने 21, विशाल नलवडेने 15 तर संतोष कदमने 14 धावा केल्या. एमपी बॉईजतर्फे स्वयंम अHपण्णावरने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमपी बॉईजने 9 षटकात 6 गडी 81 धावा कÕन सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात प्रविण शिरीने 26, विशाल गौरगौडाने 16 तर दिनेश पुजारीने 13 धावा केल्या. सीसीबीतर्फे रफिक व कयुम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात एवायएम अनगोळ बी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 116 धावा केल्या. त्यात अक्षय पाटीलने नाबाद 39, सिद्धेश वास्करने 32 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे राजेश सोरटेने 5 तर विजय पावलेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रथमेश मोरे संघाने 10 षटकात 9 गडी बाद 96 धावा केल्या. त्यात शुभम मोरेने 28 तर नितीन माटुंगेने 18 धावा केल्या. एवायएम अनगोळतर्फे अक्षयने 3 तर सत्यंमने 2 गडी बाद केले.
आजचे सामने – 1) शिवराज स्पोर्ट्स वि. साईराज वारियर्स स. 9 वा. 2) सरकार स्पोर्ट्स गांधीनगर वि. श्री स्पोर्ट्स खडकगल्ली स. 11 वा. 3) अल-रझा वि. राहुल के. आर. शेट्टी रायगड दु. 12.45 वा. 4) पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसर्या सामन्यातील विजेता.