कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
कला अकादमीच्या मुळ ढाच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. प्रकल्पाची मोठय़ा प्रमाणात दुरूस्ती मात्र केली जात आहे. कला अकादमीच्या फ्sढरदुरूस्तीचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता, अशी माहिती कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
कला अकादमीच्या फ्sढरदुरूस्तीचे काम एक वर्षापूर्वी सुरू झाले होते. अलिकडेच अनेकांनी कला अकादमीचे बांधकाम नेमके कसे चालते याची माहिती द्या व दरवाजे खुले कला अशी मागणी केल्यानंतर प्रत्यक्ष मंत्री गावडे यांनी पत्रकारांना घेऊन कला अकादमीच्या फ्sढरदुरूस्तीच्या बांधकामस्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पत्रकारांना बांधकामाची माहिती दिली.
जे आरोप करतात त्यांना आपण सांगतो की आम्ही कला अकादमीच्या मुळ साच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आहे त्याच ठिकाणी व तशाच पध्दतीने कला अकादमी उभी राहील. ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण करा असे आदेश आम्ही दिलेले आहेत. पाहूया तेवढयात बांधकाम पूर्ण होते की नाही ते असेही मंत्री गावडे म्हणाले.
कला अकादमीच्या मुख्य थिएटर सभागृहात अद्याप खोदलेले काम आहे. आता यानंतर वार्षिक पावसाळ्यात जे जमिनीतून भरतीच्यावेळी पाणी वर येत होते तसे ते येउढ नये याकरिता सर्व उपाय योजना हाती घेण्यात येत आहेत. याशिवाय कृष्ण कक्ष जो यापूर्वी चार्लस कोरिया यांनी तयार केला होता. त्या डिझाईन प्रमाणेच म्हणजेच राजांगण पध्दतीने हे कृष्ण कक्ष तयार होईल. जेवढा होईल तेवढा लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे उद्दीष्ट राहील, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
ऑगस्टमध्ये काम पूर्ण होणे कठिण
मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीच्या फ्sढरदुरूस्तीचे काम ऑगस्टपर्यंत पर्ण होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्ष पाहणी करता हा प्रकल्प ऑगस्टमध्ये नाही तर जानेवारी नंतच पूर्ण होईल असे चित्र दिसत आहे.
कला अकादमीचा परिसर पहाण्यास गेलेल्या पत्रकारांना कला अकादमीच्या सुंदर टाईल्स तसेच वेगळ्याच पध्दतीने असेली बांधणी हे सारे चित्र बदलेले दिसले. अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे, अनेक ठिकाणी खोदून ठेवलेला परिसर खुल्या थिएटरची दुरूस्ती देखील पूर्णतः केली जाणार असल्याने त्या परिसरातील करण्यात आलेली मोडतोड त्यांनी पाहिली. प्रत्यक्षात आणखी 8 महिने तरी दुरूस्तीला लागतील असे दिसून आले.