बेळगाव : कलखांब, ता. बेळगाव येथील चेकपोस्टवर सुमारे साडेचार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. अंकलगी, ता. गोकाक येथील एका रहिवाशाच्या कारमधून हे दागिने जप्त करण्यात आले असून माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केए 22, पी 9467 क्रमांकाची कार अडवून तपासणी केली असता एका बॅगमध्ये 118 ग्रॅम सोने व 1391 ग्रॅम चांदीचे दागिने आढळून आले. अंकलगी येथील वज्राय वेर्णेकर यांचे हे दागिने असून दागिन्यांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे हे दागिने जप्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कलखांब चेकपोस्टवर गोकाकहून बेळगावकडे येणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराला अडवून त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक लाख रुपये आढळून आले आहेत. हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय समितीकडे सोपविण्यात आले आहे.
Previous Articleघटप्रभा चेकपोस्टवर 50 लाखांची रक्कम जप्त
Next Article रोहित पवार यांचा उद्या रोड शो-जाहीर सभा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.