बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक संघटना शिवाजी कॉलनी आयोजित कॉलनी मर्यादित हाफ पिच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अयोध्या संघाने अक्कलकोट संघाचा एक डाव व 22 धावांनी पराभव करून छत्रपती शिवाजी चषक पटकाविला. प्रसाद कुलकर्णी सामनावीर व मालिकाविराने गौरविण्यात आले. शिवाजी कॉलनी येथील मैदानात घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी चषक क्रिकेट स्पर्धेत कॉलनीतील आठ संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात अयोध्या व अक्कलकोट संघान दरम्यान झाला. अक्कलकोट संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात सर्व गडी बाद 10 धावा केल्या. अयोध्यातर्फे पवन कांबळेने 3, तर स्वयम व प्रसन्ना त्यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पहिल्या डावात अयोध्या संघाने 5 षटकात 2 गडी बाद 57 धावा करून 36 धावांची आघाडी मिळवली. त्याच प्रसाद कुलकर्णीने 18 तर प्रतीक कांबळेने 13 धावा केल्या. दुसऱ्या डावात खेळताना अक्कलकोट संघाने 5 षटकात सर्व गडी बाद 22 धावा केल्या. त्यामुळे अयोध्या संघाने एक डाव व 22 धावाने सामना जिंकून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अयोध्यातर्फे स्वयंने 3, सागरने 2 , कावेसने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी, किशोर पोटजाळे, महेश पोटजाळे, संजय कांबळे, शिवा पाटील, रुक्मिणी कांबळे, श्वेता खांडेकर यांच्या हस्ते विजेत्या अयोध्या संघाला व उपयोजित या अक्कलकोट संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर प्रसाद कुलकर्णी, उत्कृष्ट फलंदाज आदित्य पत्रावळी, उत्कृष्ट गोलंदाज स्वयम्, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद निंबाळकर, उत्कृष्ट यष्टीरक्षक केदारनाथ, मालिकावीर प्रसाद कुलकर्णी याना चषक देऊन गौरविण्यात आले.
Previous Articleकडोलीच्या प्रथमेश डोंगरेची गोवा क्रिकेट संघात निवड
Next Article कॉसमॅक्स एफसी, दर्शन एफसी विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.