वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटोनी यांचा पुत्र अनिल अँटोनी यांनी गुऊवारी भाजपमध्ये प्रवेश केला. अनिल अँटोनी यांनी जानेवारीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. गेल्या एक-दोन महिन्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच गुऊवारी नवी दिल्लीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. आपल्या मुलाच्या निर्णयावर ए. के. अँटोनी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अनिल अँटोनी यांनी गुऊवारी नवी दिल्लीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये येण्याचे कारणही स्पष्ट केले. एक भारतीय नागरिक या नात्याने राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या पंतप्रधानांच्या व्हिजनमध्ये योगदान देणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनिलचा निर्णय दु:खदायी : ए. के. अँटोनी
अनिल यांनी आपले वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. तसेच तिऊअनंतपुरममध्ये माध्यमांशी संवाद साधताना ए. के. अँटोनी यांनीही पुत्राच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. अनिलच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाचे मला दु:ख वाटते. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. एकता आणि धार्मिक सलोखा हा भारताचा आधार आहे. 2014 नंतर, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप पद्धतशीरपणे विविधता आणि धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचवत आहे, असे अँटोनी म्हणाले. तसेच आपली निष्ठा नेहमीच ‘नेहऊ परिवारा’सोबत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.