डिजीलॉकर सुविधेचा ( Digilocker ) लाभ नागरिकांना आता व्हॉट्सअॅपवरही ( WhatsApp ) घेता येणार आहे.
यात नवीन खातं उघडणं, खात्याची वैधता तपासणं, कागदपत्र डाऊनलोड करणं यासारख्या सुविधांचा समावेश आहे, असं केंद्र सरकारनं कळवलं आहे. त्यासाठी नागरिकांना डिजिलॉकर संलग्न मोबाइलवरुन 90 13 15 15 15 या क्रमांकावर Namaste किंवा Hi किंवा Digilocker असा मेसेज पाठवावा लागेल. त्यांनतर डिजीलॉकर सुविधा आपण वापरू शकता.