तुमच्या कानांची ऐकण्याची क्षमता कमी होतेय का याचे संकेत तुमच्या डोळ्यांमधून मिळू शकतात असा दावा नव्या संशोधनात करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीला कमी ऐकू येते, तो एका दिशेने पाहून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच ऐकताना त्याच्या डोळ्यांमध्ये फारशी हालचाल होत नाही, तो एकाच ठिकाणी लक्ष केंद्रीत करतो असे संशोधकांचे सांगणे आहे.
गोंगाटात कुठल्याही एका आवाजावर लक्ष केंद्रीत करणे हियरिंग लॉस नाही, ही एक सामान्य प्रक्रिया असून जेव्हा आपण लक्ष केंद्रीत करतो तेव्हा डोळ्यांमध्ये हालचाल होत नाही. हीच वस्तुस्थिती विचारात घेत अध्ययन केले आहे. याच्या आधारावर हियरिंग प्रोसेस आणि कानांशी निगडित आजारांचा शोध लावण्यात डोळे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हणू शकतो असा दावा संशोधक एरिक कुई आणि ब्योर्न हेरमॅन यांनी केला आहे.
अध्ययनानुसार इनर इयरमध्ये व्हायरल इंफेक्शन झाल्याने नर्वला नुकसान पोहोचते. यामुळे हियरिंग लॉस होऊ शकते. तापमान वाढणे, घटणे आणि आर्द्रतेमुळे कानात फ्ल्यूड तयार झाल्याने दीर्घकाळापर्यंत सूज आणि इंफेक्शन राहिल्याने श्रवणशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. एक किंवा दोन आठवड्यापर्यंत राहणारे इंफेक्शन रिकव्हर होते. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापर्यंत इंफेक्शन राहिल्याने पडद्याला हानी पोहोचू शकते.
2050 पर्यंत…..
फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल इन्स्टीट्यूटच्या संशोधनात काही लोकांमध्ये मधूमेह आणि नैराश्यामुळे श्रवणशक्ती विषयक समस्या उद्भवल्याचे आढळून आले होते. तर काही लोकांना एकटेपणा, शहरी गोंगाट आणि हेडफोनच्या वापरामुळे त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील सुमारे 150 कोटी लोक कुठल्या न कुठल्या स्वरुपात श्रवणशक्ती विषयक समस्येला सामोरे जात आहेत. ही संख्या 2050 पर्यंत वाढून 250 कोटी होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे आरोग्य समस्येच्या स्वरुपात पाहिले जात आहे.
फ्रान्समध्ये 25 टक्के लोक प्रभावित
फ्रान्समध्ये 4 पैकी एक जण श्रवणशक्ती विषयक समस्येला सामोरा जात आहे. हळूहळू ते बहिरे होत चालले आहेत. म्हणजेच येथील 25 टक्के लोकसंख्या प्रभावित होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. पहिल्यांदाच फ्रान्समध्ये अशाप्रकारचे संशोधन मोठ्या स्तरावर करण्यात आले असून यात 18-75 वयोगटातील 1,86,460 जणांना सामील करण्यात आले होते.