बेळगाव : खाद्यपदार्थांचा दर्जा व गुणवत्तेवरून बेळगावमधील हॉटेल्सना यावर्षी १ लाख १४ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील प्रमुख हॉटेल्स आणि रस्त्या शेजारील खाद्य विक्रेत्यांनी तयार केलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेची वारंवार चाचणी करायला हवी. त्रुटी आढळून आल्यास कारवाईसह दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या आहार सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाच्या बैठकीवेळी ते बोलत होते. काही हॉटेल्समध्ये स्वयंपाक करताना अजिनोमोटो सारख्या प्रतिबंधित पदार्थांचा उपयोग केला जात आहे. अशा हॉटेल्स आणि दुकानांना सीज करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Trending
- भामट्यांकडून आता वीजबिलाच्या नावे फसवणूक
- मार्कंडेयनगरात बालिकेचा संशयास्पद मृत्यू
- इमारत पूर्णत्व दाखल्यासाठी भरावा लागणार अर्ज क्रमांक एक
- पूरस्थिती निवारण्यासाठी पूर्वतयारी करण्याची सूचना
- लोकसभा निवडणुकीमुळे के-सीईटी निकालाला विलंब?
- तिरुपती-बेळगाव विमानफेरी अचानक रद्द
- उत्तर भागात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय
- मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी