ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग लागली आहे. एंडोस्कोपी कक्षाला ही आग लागली असून, कक्षातील सर्व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा घटनास्थळी दाखल असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयाच्या एंडोस्कोपी कक्षात दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. आग लागताच रुग्णालयातील सेवकांनी या कक्षातील सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढले. सध्या अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा घटनास्थळी दाखल असून, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
VIDEO | The fire at Delhi's AIIMS was brought under control by fire officials. pic.twitter.com/4VbhLI2gzN
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2023