वृत्तसंस्था /अहमदाबाद
2023 च्या प्रो-कब•ाr लिग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा 50-28 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेतील हा 10 वा सामना होता. पाटणा पायरेट्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील सामन्यात पाटणा पायरेट्सतर्फे प्रमुख रायडर सचिनने दर्जेदार खेळ करत 14 गुण मिळविले. तर तेलुगू टायटन्सतर्फे पवन सेहरावतने एकाकी लढत देत 11 गुण घेतले. सेहरावतच्या आक्रमक चढाईच्या जोरावर सामन्यातील दुसऱ्याच मिनिटाला टायटन्सने पाटणा संघावर 3-1 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर पाटणा संघातील सचिनने आपल्या सुपर चढाईवर आपल्या संघाला टायटन्सशी बरोबरी करुन दिली. तर चौथ्या मिनिटाला सेरावतच्या सुपर रेडवर टायटन्सने पुन्हा पाटणा संघावर 6-3 अशी आघाडी घेतली. 10 व्या मिनिटाला सचिनच्या आक्रमक चढाईने पाटणा संघाला टायटन्सवर 11-10 अशी नाममात्र आघाडी घेता आली. टायटन्सच्या ओंकार पाटीलने पुन्हा आपल्या संघाला 13-13 अशी बरोबरी साधून दिली. 13 व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सचे सर्व गडी बाद झाल्याने पाटणा संघाने टायटन्सवर 19-13 अशी 7 गुणांची भक्कम आघाडी घेतली. मध्यंतराला केवळ एक मिनिट बाकी असताना टायटन्सचे पुन्हा सर्व गडी बाद झाल्याने पाटणा पायरट्सने मध्यंतरावेळी 28-16 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला सचिनने पुन्हा आपल्या संघाची आघाडी वाढविली. 27 व्या मिनिटावेळी पाटणा संघ 34-22 असा आघाडीवर होता. पाटणा पायरेट्सने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखत टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणले.