तरुण भारत वृत्ताची दखल
शिये प्रतिनिधी
येथील शेतीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम महावितरणने सूरू केले. रविवारी २४ रोजी येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठीचा ट्रान्सफॉर्मर आठ दिवसात न बदलल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. शेतकर्यांच्या बैठकीनंतरचे वृत्त दैनिक तरुण भारत ने २५ रोजी प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेत जून्या ट्रांसफार्मर शेजारीच नवीन ट्रांसफार्म बसविण्याचे काम सुरू केले.
ऐन उन्हाळ्यात शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार होता. शियेतील पाटील मळ्यात दोन नंबर ट्रान्सफॉर्मर व डीपी धोकादायक स्थितीत आहे. तर चार नंबर ट्रान्सफार्मरची दुरावस्था झाली आहे. या दोन्ही ट्रान्सफॉर्मर वरुन शेतीला पाणी पुरवठा करणार्या वीज पंपाला विद्युत पुरवठा केला जातो. भारनियमनामुळे अगोदरच शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे जेवढा वेळ वीज पुरवठा व्हायला हवा त्यातही खराब स्थितीत असणारे हे ट्रान्सफॉर्मर मोठा व्यत्यय निर्माण करतात. महावितरणच्या अधिकार्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत जून्या ट्रांसफार्म शेजारीच नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे काम बुधवारी दुपारी सुरू केले.
यावेळी शहाजी तासगावकर, संदीप पाटील, संतोष पाटील, उल्हास पाटील, अमर पाटील, रवींद्र पाटील यांच्या सह महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित होते.
पाटील मळा ट्रान्सफार्मर वरील डिटीसी स्ट्रक्चर बसविण्याचे काम सुरू केले आहे. एक आठवड्यात काम पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठाशी चर्चा करुन ट्रान्सफार्मवरील लघु विद्युत दाबाच्या तारा बदलण्याकरीता पाठपुरावा करणार आहे. तसेच चार नंबर ट्रांसफार्मरसह सहा ट्रान्सफार्मवरील बॉक्स पेट्या बदलणार आहे.
किरण नरळे
सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय, शिये