13 हजार किलोमीटर अंतराचा सायकलवरून प्रवास
एका युवकाने सायकलवरून हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. स्वतःच्या प्रवासादरम्यान या युवकाने 12 हून अधिक देशांना पालथे घातले आहे. या युवकाने स्वतःचा प्रवास अमेरिकेच्या अलास्कामधून सुरू करत अर्जेंटिनामध्ये संपविला आहे. हे अंतर 13 हजार किलोमीटरपेक्षा अधिक होते.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणारा लियाम गार्नरने हायस्कूलमध्ये उत्तीर्ण झाल्यावर स्वतःच्या अनोख्या प्रवासास सुरुवात केली होती. यापूर्वी लियामने लॉस एंजिलिस तसे सॅन फ्रान्सिस्कोदरम्यान सायकलने प्रवास केला होता. लियामने वयाच्या 17 व्या वर्षी 1 ऑगस्ट 2021 रोजी सायकलने प्रवास सुरु केला होता.
जेडिडियाह जेनिकिन्स यांचे एक पुस्तक वाचले होते. त्यांनी ऑर्गनहून अर्जेंटिनादरम्यान 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. यातूनच प्रभावित होत मी स्वतःच्या ऍडव्हेंचरस प्रवासाची योजना आखल्याचे लियामने सांगितले आहे.
या यात्रेसंबंधी फारशी तयारी केली नव्हती. स्वतःसोबत टेंट, स्लीपिंग बॅग, पोर्टेबल बॅटरी, मेडिकल किट आणि सायकलचे पार्ट्स घेत प्रवास सुरू केला होता असे लियामने सांगितले आहे. लियाम सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे. त्याने स्वतःच्या प्रवासासंबंधी अनेक व्हिडिओज तयार केले आहेत. त्याचा सायकल प्रवास मेक्सिको, ग्वाटेमाला, निकाराग्वा, कोलंबिया, पेरू, चिली, अर्जेंटिना समवेत 14 देशांमधून झाल आहे. या यात्रेवरून अनेक प्रकारचे मार्ग होते, यातील काही अधिकृत तर काही अनधिकृत होते असे लियामने म्हटले आहे.
माझे आईवडिल विभक्त झाले आहेत, अशा स्थितीत त्यांना माझ्या प्रवासाबद्दल फारसा विश्वास नव्हता. माझ्या या प्रवासात माझी जोडीदार लोगन सोबत होती. परंतु ती केवळ कोलंबियापर्यंत सोबत होती. या प्रवासादरम्यान 5 वेळा मला लुटण्यात आले, एकदा तर रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. तेथे 40 टाके घालावे लागले होते. सुमारे एक महिना मला रुग्णालयात काढावा लागला, तेथे एक शस्त्रक्रिया देखील झाल्याचे लियामने सांगितले.