वारणानगर प्रतिनिधी
कोडोली – बोरपाडळे या राज्य मार्गांवर शहापूर (ता. पन्हाळा) येथे ट्रॅक्टर वरील वेगाचे नियंत्रण सुटल्यांने चालक ऋतिक दयानंद कांबळे (वय २१ रा. अंबेगाव ता. निलंगा जि. लातूर) हा ठार झाला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,ट्रॅक्टरकांबळे हा नावली ता. पन्हाळा येथून ट्रॅक्टर घेऊन कोडोली कडे जात होता. शहापूर येथील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या वळणावर ट्रॅक्टर वरील त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रोडच्या कडेल्या असलेल्या नाल्यात पडला. यावेळी चालक कांबळे हा ट्रॅक्टरच्या स्टेअरिंग वरून जमीनीवर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.