हिंडलगा : शुक्रवारी (दि. 26) दुपारी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अचानक दाखल झालेल्या वळिवाच्या पावसामुळे मण्णूर मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले जुनाट झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल झाल्याचा प्रकार घडला. मण्णूर रस्त्याच्या दुतर्फा काही जुनाट झाडे आहेत. शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पावसामुळे यातील एक भलेमोठे झाड मुख्य रस्त्यावरच कोसळले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य मधुकर चौगुले यांनी त्वरित धाव घेत वैजनाथ कोल्हापुरे व अन्य नागरिकांच्या मदतीने सदर झाड रस्त्यावरून हटविले व रस्ता वाहतुकीला मोकळा करून दिला. त्यामुळे सुमारे तासभर अडकून पडलेल्या वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. झाड कोसळल्याने काही वीजखांबांना देखील याचा धक्का लागला होता. परिणामी दुऊस्ती व खबरदारी म्हणून हेस्कॉमला वीजपुरवठा खंडित करावा लागल्याने ग्रामस्थांना मात्र बराच वेळ अंधाराचा सामना करावा लागला.
Previous Articleहिंदू धर्माला भाजपकडूनच धोका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.