युवकाची आयएएस होण्याची कहाणी
इमरान जाहिद आणि श्रुती सोढी या कलाकारांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘अब दिल्ली दूर नहीं’चा दमदार ट्रेलर जारी करण्यात आला आहे. इमोशनल-ड्रामा चित्रपट एका रिक्षाचालकाच्या मुलाच्या सत्यघटनेवर आधारित आहे. गोविंद जयसवालची 2007 मध्ये युपीएसीत निवड होत तो आयएएस अधिकारी झाला होता. चित्रपटात गोविंद यांची व्यक्तिरेखा इमरान जाहिदने साकारली आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/05/DELHI-1.jpg)
बिहारच्या एका छोटय़ा शहरातून एक युवक आयएएस होण्यासाठी दिल्लीत पोहोचत असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येते. या चित्रपटात श्रुती सोढीने या युवकाच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. आयुष्यात उद्भवलेल्या आव्हानांवर हा युवक कशाप्रकारे मात करतो याला चित्रपटात स्थान देण्यात आले आहे.
अब दिल्ली दूर नहीं चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे, चित्रपटात एका सामान्य व्यक्तीची असाधारण कहाणी दर्शविण्यात आली आहे. हा व्यक्ती स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट 12 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.