अभिनेत्री तापसी पन्नूचा चित्रपट
तापसी पन्नूचा बहुप्रतीक्षित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘शाबाश मिट्ठू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तापसी ही माजी महिला क्रिकेटपटू मिताली राजची व्यक्तिरेखा साकारत आहे. 2 मिनिटे 44 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार राहिलेल्या मितालीच्या बालपणापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंतची पूर्ण कहाणीची झलक दिसून येते.
लहानपणीची आवड तिला मोठे झाल्यावर देखील क्रिकेटच्या मैदानात कशाप्रकारे ओढून आणते हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. प्रशिक्षक मितालीच्या आईवडिलांना तिला राष्ट्रीय पातळीवर खेळू देण्याची अनुमती देण्याची विनंती करत असल्याचे यात एक दृश्य आहे. तर प्रशिक्षक स्वतःच्या मुलाच्या जागी मुलगी मितालीला राष्ट्रीय पातळीवर खेळू देण्यास सांगत असल्याचे पाहून तिचे आईवडिल अवाप् होत असल्याचेही यात दिसून येते.
तापसीचा हा चित्रपट 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट ओटीटीवर नव्हे तर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. श्रीजीत मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटासाठी तापसीने खूप मेहनत केली आहे.