दिवाळी जवळ आली की प्रत्येक घराघरात फराळाची लगबग सुरु होते. त्यात कुरकुरीत चकली हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ असतो.पण बऱ्याच वेळेला चकली मऊ पडते आणि बिघडते. तर काही जणांना चकलीची भाजणीही नीट जमत नाही. म्हणूनच आज आपण बिना भाजणीची आणि झटपट होणारी चकली रेसीपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
२ कप गव्हाचे पीठ
अर्धा कप तांदूळ पिठ
१ चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
अर्धा चमचा ओवा
१ चमच धने पूड
1/2 चमचाहळद
1/2 चमचा पाढंरे तिळ
तेल
कृती
सर्वप्रथम एका कुकरच्या डब्यात दोन कप गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ घाला हे पीठ आपल्याला कोरडे गरम करून घ्यायचे आहे म्हणून वरून एक सुती कापडाने झाकून घ्या आणि वरती झाकण ठेवा. कुकर मध्ये पाणी घालावे खाली आता पीठ असलेले भांडे कुकरमध्ये ठेवून पंधरा मिनिटे शिट्टी काढून वाफ द्यावी त्यानंतर कुकर थंड होऊ द्यावा आणि पीठ बाहेर काढून घ्यावे. आता एका परातीत सर्व मसाल्याचे पदार्थ आणि मीठ घ्यावे.तांदळाचे आणि गव्हाचे पीठ हे आता घट्ट झालेले असेल त्याला चमच्याने मोकळे करून घ्यावे आणि चाळणी मध्ये घेऊन चाळून घ्यावे.हे पीठ परातीतल्या मिश्रणात घ्यावे आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे पीठ खूप पातळ करू नये.चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून चकल्या गाळून घ्याव्यात आणि मध्यम आचेवर तेलात तळून घ्याव्यात.ही चकली छान खुसखुशीत होते. तुम्ही ही नक्की ट्राय करा.