प्रतिनिधी,इचलकरंजी
Ichalkaranji Crime News : शहरातील सहा बड्या सुत व्यापाऱ्यांच्या टोळीने सुत खरेदी व्यवहारातून शहरामधील एका सुत खरेदी व्यावसायिकाला 1 कोटी 87 लाख 2 हजार 133 ऊपयाला गंडा घातला.फसवणूक झालेल्या संबंधीत व्यावसायिकाने या टोळीकडे पैश्याची मागणी केली असता पैसे देणार नाही.काय करायचे ते कर.पुन्हा आल्यास जिवंत सोडणार नाही,अशी धमकी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले.पोलिसांनी या टोळीतील दोघा सख्या भावाच्या मुसक्या आवळल्या.पंकज पुष्पक अग्रवाल,प्रविण पुष्पक अग्रवाल (रा. कागवाडे मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.तर चौघे संशयीत जण पसार झाले आहेत.
गोपीकिशन हरिकिशन डागा (रा. इचलकरंजी) यांचा सुत खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.हा व्यवसाय ते श्री हनुमान यार्न सिंडीकेट व श्रीहरी सिंटेक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन फर्मच्या माध्यमातून करत आहेत.त्यांच्याकडून शहरातील बडे सुत व्यापारी असलेले अग्रवाल कुटूंबीय सुत खरेदी करीत होते.त्याकरीता अग्रवाल कुटूंबीयाकडून पियुष टेक्स्टाईल या नावाच्या फर्मचा वापर केला जात होता.सुरूवातीच्या काळात संशयीतांनी सुत खरेदी कऊन त्यांचे पैसे वेळेवर देवू डागा यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर ही टोळी सुत खरेदीचे पैसे त्यांना एनइएफटीव्दारे पाठवू लागली.याचदरम्यान या टोळीने त्यांच्याकडून 1 कोटी 87 लाख 2 हजार 133 ऊपये किंमतीचे सुत खरेदी केले. बिलाचे पैसे एनइएफटीव्दारे पाठविल्याचे सांगून,त्याबाबतचा युटीआर नंबर देखील पाठविला.त्यानंतर डागा यांनी बँकेत जावून यूटीआर नंबरची खात्री केली.त्यावेळी पैसे न पाठविता.बनावट यूटीआर नंबर तयार कऊन,याबाबतचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून गंडा घातल्याचे डागा यांच्या निदर्शनास आले.त्यांनी अग्रवालकडे पैश्याची मागणी केली.त्यावेळी या टोळीने पैसे देण्यास नकार दिला.
या प्रकरणी डागा याने शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली.शहरातील बडे सुत व्यापारी पंकज पुष्पक अग्रवाल,त्याची मुले पियुष अग्रवाल,मयुर अग्रवाल, भाऊ प्रविण पुष्पक अग्रवाल,वडील पुष्पक अग्रवाल आणि रेखा रोडलाईन्सचे मालक प्रितेश शहा यांच्या टोळीविरोधी फिर्याद दिली.गुन्हा दाखल होताच काही वेळात पंकज अग्रवाल,प्रविण अग्रवाल (रा. कागवाडे मळा, इचलकरंजी)या दोघा भावांच्या मुसक्या आवळल्या.तर पंकज अग्रवाल याची मुले पियुष, मयुर, त्यांचे वडील पुष्पक अग्रवाल आणि रेखा रोडलाईन्सचे मालक प्रितेश शहा हे चारजण पसार झाले.