प्रतिनिधी/ बेंगळूर
ऑनरकिलिंग प्रकरणात न्यायालयाने दोघांना फाशी आणि 6 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विजापूरच्या द्वितीय सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ऑनरकिलिंग प्रकरणी इब्राहिमसाब अत्तार व अकबरसाब अत्तार यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रमजान बॉबी, दावलबी जमादा, आजमा यांच्यासह 6 जणांना जन्मठेपेसह 4.19 लाखांचा दंड ठोठावला आहे.
विजापूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील हाळगुडनकाळ येथील बानू बेगम अत्तार व सायबण्णा यांनी प्रेमविवाह केला होता. नंतर ते दुसऱ्या गावी स्थायिक झाले. 2017 मध्ये प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या बानू बेगम व तिचा पती सायबण्णा यांच्यावर बानू बेगमचे आई-वडील व नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केला. यात बानू बेगम मूर्च्छा येऊन खाली कोसळली. तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. मात्र, सायबण्णाला लोकांनी वाचविले. या घटनेप्रकरणी ताळीकोटे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.