धारबांदोडा : सुकतळी-मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर इनोवा कार केए 25 झेड 7555 व अल्टो कार जीए 07 सी 8701 यांच्यात झालेल्या अपघातात अल्टो कार चालक व एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात काल रविवारी सकाळी घडला. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्टो कार मधील कारचालक ज्युलियो पणजी व शेजारी बसलेली नरून निसा राहणारी छत्तीसगड गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. इनोवा कारच्या चुकीमुळे हा अपघात घडला असून इनोवा कार धारवाडहून फोंडा दिशेने जात होती. तर अल्टो कार पणजी येथून मोले दिशेने येत होती. यावेळी इनोवा कारने समोरून जाणाऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे समोरून येणाऱ्या अल्टो कारला जोरदार धडक दिली. यात अल्टो कारचा समोरचा भाग चक्काचुर झाला आहे. विशेष म्हणजे मोले ते पणसुले-धारबांदोडा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर चढउतार असल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. महत्वाचे म्हणजे सुकतळी येथे आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. येथील राजलक्ष्मी पेट्रोल पंपजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी चढउतार काढण्यात यावे अशी अनेक वर्षे येथे लोकांची मागणी आहे. मात्र अजूनही यावर ठोस असा उपाय केला जात नाही याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे होणाऱ्या अपघातांची नोंद घेऊन त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. याप्रकरणी पोलीस दशरथ गावस यांनी पंचनामा केला.
Previous Articleसुट्टीतील शेवटच्या दिवशी शालेय साहित्य खरेदीसाठी उधाण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.