ऑनलाईन टीम/तरुण भारत
अरुणाचल प्रदेशातील (arunachal pradesh) भारत-चीन सीमेवरून (india china border) तैनात असलेले लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले आहेत. मागील १४ दिवसांपासून ते बेपत्ता असल्याचे समजत आहे. हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंह राणा अशी या जवानांची नावं आहेत. राणा आणि नेगी २८ मेपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेले जवान उत्तराखंडचे रहिवासी आहेत. राणा आणि नेगी बेपत्ता असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. तेव्हापासून दोघांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. या प्रकरणी लष्करानं कोणतीही अधिकृत माहिती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.
अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेवर तैनात उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील नायक प्रकाश राणा आणि एक अन्य जवान गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. २९ मे पासून बेपत्ता असलेल्या या जवानांचा कोणताही ठावठिकाणा मिळालेला नाही. लष्कर व स्थानिक लोक बेपत्ता जवानांचा शोध घेत आहेत.
लष्कराकडून बेपत्ता जवानांच्या कुटूंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. प्रकाश राणा (३४) यांचे कुटूंब देहरादूनमधील अंबीवाला येथील सैनिक कॉलनीत राहते. गढवाल रायफल्समध्ये तैनात नायक राणा सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेवर ड्युटी करत होते. दोन्ही जवान नदीतून वाहून गेले असल्याची शक्यता सैन्यदलाने व्यक्त केली आहे. बेपत्ता दुसऱ्या जवानाचे नाव हरेंद्र नेगी असे असल्याचे समजते.
सहसपूर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सहदेव सिंह पुंडिर यांनी सैनिकी वसाहतीत जाऊन राणा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मी याबद्दल संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याशी संवाद साधला. पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे, अशी माहिती पुंडिर यांनी दिली. बेपत्ता जवान राणा यांच्याबद्दलचा संपूर्ण तपशील आपण भट्ट यांनी पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.