नवी दिल्ली :भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. यातना सहन केल्या आहेत. आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे हे क्रांतीकारकांनी दिलेल्या बलिदानानेच. त्यांमुळे अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारांच्या आठवणी जपणे आपले कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज दिल्लीतील राजभवनातील ‘क्रांतिगाथा’ गॅलरीचे उद्धाटन आणि लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)बोलत होते.
हेही वाचा- येत्या दीड वर्षात मिळणार 10 लाख सरकारी नोकऱ्या
यावेळी बोलताना ते म्हणाले, क्रांतिकारी गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणे हा चांगला मुहूर्त आहे. क्रांतिकारकांमुळे पावन झालेले हे तीर्थस्थळ आहे. क्रांतिकारी गॅलरीमुळे समोरच्या पिढीला सैनिकांची माहिती होईल. गॅलरी काढून काहीही होणार नाही. इतिहासाचे जतन करणे हे आपले काम आहे. कारण, या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. यासाठी लढा द्यावा लागला. अशा सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यपालांनी आपलं निवासस्थान हे फार छान बांधलं असेही ते म्हणाले.
राजभवन हे लोकभवन व्हावं-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नागरीकांनी राजभवनाला भेट द्यावी.राज्यपालांनी औरगंबादचा पाणी प्रश्न, सिंचन प्रकल्प हे राज्य सरकारचे अडचणीचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे उपस्थित केले.राज्यात दोन वर्षांपासून विकास महामंडळांच्या नेमणुका झालेल्या नाहीत, मी गरजेप्रमाणे त्यांची समीक्षा करतो,अनेक योजना अर्ध्या आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री इथे आहेत. हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. औरगंबादच्या पाणीप्रश्नाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तो प्रश्न पंतप्रधानांची सोडवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नवं राजभवन राज्याच्या जनतेला ऊर्जा देईल- पंतप्रधान मोदी
एका चांगल्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. मला खूप आनंद होत आहे अस म्हणत पंतप्रधानानंनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी क्रांतीगाथा गॅलरीच्या उद्घाटनाची घोषणा केली. नवं राजभवन राज्याच्या जनतेला ऊर्जा देईल.महाराष्ट्राच्या संत परंपरेमुळे देशाला प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाकाज देशासाठी प्रेरणादायी आहेत. असेही ते म्हणाले. राजभवन अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. क्रांतिगाथाच्य़ा गॅलरीतून देशातल्या प्रत्येकाला चेतना मिळेल. मुंबईसह अनेक शहरात पायाभूत विकासाची यात्रा सुसाट होणार असल्याचेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, जगातल्या अनेक देशांना आपल्या स्वातंत्र्यसंग्रामानं प्रेरणा दिली. राजभवनातल्या बंकरचा ७५ वर्षात पत्ता लागला नाही, हे दुर्देवी आहे. आपल्या पाऊलखुणांबाबत आपण किती उदासीन आहोत हे सिध्द होते. अशी नाराजी व्यक्त केली.
Previous Articleराधानगरी पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment