जलतरण क्षेत्रात दिव्यांग जलतरणपटूंना त्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना पोहण्यापासून प्रवृत्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे दिव्यांगांचे खरे आश्रयदाता म्हणजे जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांनी मोलाची कार्य केले आहे.
यांनी गेल्या 22 वर्षांपासून दिव्यांग मुलांना पोहण्याचे मोफत प्राथमिक धडे देऊन त्यांनी आत्तपर्यंत 5 हजारहून अधिक दिव्यांगाना मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अहोरात्र झटून न डगमगता निस्वार्थीपणाने कार्य केले आहे. त्याचीच खरी पोचपावती म्हणून बेळगावातील 7 दिव्यांग जलतरणपटूनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन आपल्या देशासाठी 50 हून अधिक पदके मिळवून संपूर्ण जगामध्ये भारताचा ठसा उमठविला आहे.
उमेश कलघटगी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण तरुण भारत समोरील मराठी सरकारी शाळा क्र. 11 मध्ये झाले. माध्यमिक शिक्षण बेननस्मिथ हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण गोगटे वाणिज्य महाविद्यालय येथे पूर्ण केले. आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत चमक दाखवित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे तीनदा प्रतिनिधीत्व केले तर 1 वर्ष आंतरविद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. परंतू स्वत:च्या कामगिरीबद्दल संतुष्ट न होता इतरांसाठी काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची जिद्द बाळगून पोहण्याचे शिक्षण देण्यास सुरु केले. हे शिकवित असताना त्यांनी दिव्यांग मुलांना मोफत शिकविण्याचा संकल्प केला. दिव्यांग मुलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते व त्याचा पुरेपूर लाभ उठवित राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मजल मारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या दिव्यांगांची प्रगती पाहून इतर दिव्यांगांनीही पोहण्याची प्रेरणा घेऊन पोहण्यास सुरुवात केली.
या दिव्यांगामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल म्हणजे राघवेंद्र अणवेकर, राजेश शिंदे या दोघांनी तर इंग्लिश खाडी पूर्ण करण्याची जिद्द घेऊन त्यांनी सुरुवात केली. त्यामध्ये राजेश शिंदेने इंग्लिश खाडी पूर्ण करून एक नवा विक्रमच केला आहे. दुर्दैवाने इंग्लिश खाडीतील तपमान राघवेंद्र अणवेकरला मानवले नाही. त्यामुळे तो इंग्लिश खाडी पूर्ण करण्यापासून वंचित राहला. त्यानंतर मोईन जुनेदी हा 11 वर्षीय उंची 20 इंच, वजन 20 किग्रॅ. आत्तापर्यंत 300 हून अधिक फ्रॉक्चरर्स् होऊन देखील अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन आपल्या देशासाठी सुवर्णपदक प्राप्त केले. त्याची विशेष दखल बीबीसी न्यूजने घेतली होती.
आतिश जाधव, सिमरन गौंडाडकर, श्रीधर माळगी, उमेश खाडे, जोतिबा कणबरकर, अमोल कांबळे, स्वस्तिक पाटील, साहिल जाधव, जयानंद तुपुगोल, मल्लिकार्जुन पाटील, निखील बिद्राली, संगीता काशेट्टी या दिव्यांगपटूंनी आज राष्ट्रीयस्तरावर चमक दाखवली आहे.
उमेश कलघटगी अॅक्वेरियस स्वीमिंग क्लबचे अध्यक्ष असून स्विमर्स क्लबचे प्रमुख जलतरण प्रशिक्षक आहेत. कर्नाटक पॅरा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमीचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे बोर्ड ऑफ स्पोर्ट आणि फिजिकल कल्चर (काहेर) व युनियन जिमखानाचे ते सभासद आहेत.
उमेश कलघटगी यांना गुरुदेव स्मृती पुरस्कार हा पुरस्कार केएलईचे उपकुलगुरु डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य पुरस्कार देण्यात आला आहे. दैवज्ञ भूषण पुरस्कार, पत्रकार विकास मंडळ पुरस्कार, प्रेसिडंट डिस्ट्रीक्ट पुरस्कार, केएलईतर्फे जलतरणपटू व दिव्यांगांना केलेल्या कार्याबद्दल खास गौरव करण्यात आला. रोटरी लिडरशिप पुरस्कार, संगीत साहित्य अकादमी पुरस्कार, ओकेशनल पुरस्कार, बी. आर. मुदगी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल भारतातील अनेक दिग्गजांनी त्यांचे कौतुक केले. त्यामध्ये भारताचे माजी उपराष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, श्री श्री रविशंकर, गुरु रामदेवबाबा, शिवकेरा, सुधा मूर्ती, डॉ. प्रभाकर कोरे, सुरेश अंगडी आदींसह अधिकारी व इतर वरिष्ठ नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
उमेश कलघटगी यांनी आत्तापर्यंत इंडियन जलतरण संघाचे प्रशिक्षक म्हणून हाँगकाँग, मलेशिया, डेन्मार्क, पिस्टोरिका, इंग्लंड आणि युनायटेड किंगडम येथे काम पाहिले.
– उमेश मजुकर