डॉ. रवी पाटील यांचा करणार प्रचार
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता बेळगाव उत्तरचे भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये गृहमंत्री अमित शहा सहभागी होणार असून मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. धर्मवीर संभाजी चौकापासून अमित शहा यांच्या ‘रोड शो’ला सुरुवात होईल. किर्लोस्कर रोड, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, गणपत गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक असा रोड शो होणार आहे. यामध्ये कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. रवी पाटील यांनी केले आहे. अमित शहा सकाळी होस्पेट येथे प्रचार करून त्यानंतर सौंदत्ती, अथणी, रायबाग, चिकोडी, सदलगा, यमकनमर्डी येथे प्रचार करून सायंकाळी बेळगाव शहरात पोहोचणार आहेत.