न्हावेली / वार्ताहर
आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त १५ ते २४ ॲाक्टोंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार १५ रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना,दुपारी १ वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम,रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी भजनांचा कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता जुगलबंदी भजनाचा कार्यक्रम,सोमवार १६ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी,रात्री ८ वाजता दांडिया नृत्य,मंगळवार १७ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी,रात्री ८ वाजता भजनांचा कार्यक्रम ,बुधवार १८ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी,रात्री १० वाजता नाईक दशावतार नाट्यमंडळ ,मोचेमाड ,गुरुवार १९ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी, रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम , शुक्रवार २० रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी,त्यानंतर भजनाचा कार्यक्रम रात्री १० वाजता नितिन आसयेकर प्रस्तुत भूमिका दशावतार नाट्यमंडळ,मळगाव यांचा नाट्यप्रयोग ,शनिवार २१ रोजी रात्री ७ वाजता आरती दिवे आरास महिलांसाठी ,रात्री ७.३० वाजता निमंत्रित भजन स्पर्धा , रविवार २२ रोजी सकाळी ७ वाजता श्री त्रिशक्तीयाग अनुष्ठान,रात्री ७ वाजता आरती,रात्री ७.३० वाजता श्री शिवभूमिका घुमट आरती ग्रुप साळ गोवा रात्री १० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग ,सोमवार २३ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,त्यानंतर आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद त्यानंतर रात्री देवस्थानिक कार्यक्रम व वारकरी भजनाचा कार्यक्रम,मंगळवार २४ रोजी दुपारी २ वाजता चपईनृत्य दुपारी ३ वाजता शिवलग्न दसरा होणार आहे .