तरुणभारत ऑनलाइन टीम
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. सध्या तो उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये त्याच्या आगामी ‘बवाल’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शहरातील आनंदबागच्या गजबजलेल्या परिसरात तो शूट करत असताना त्याचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.
लीक झालेल्या या फोटोंमध्ये काळी पँट, शूज आणि सनग्लासेस घातलेल्या निळ्या शर्टमध्ये वरुण डॅशिंग दिसत आहे.हे फोटो व्हायरल झाल्यानंतर वरुणने स्वतः हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. काय गोंधळ करताय!,माझा फोटो लीक केला. लव्ह यू कानपूर , चला आत्ता मी पण टाकतो असं त्याने फोटोखाली कॅप्शन दिल आहे. दरम्यान,या चित्रपटातीत वरुण सोबत अभिनेत्री जान्हवी कपूरही दिसणार आहे. साजिद नाडियादवाला सह नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.भारत आणि युरोपमधील वेगवेगळ्या ठिकाणीहीया चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.