ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यावर वसंत मोरेंनी (vasant more) नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर मोरे यांना पुणे शहर अध्यक्षपदाला मुकावे लागले होते. यांनतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावेळी अनेक पक्षांनी त्यांच्या संपर्क साधला होता. स्वतः मोरे यांनी याविषयी माहिती दिली होती. परंतु वसंत मोरे यांनी मनसे सोडणार नसल्याचे म्हंटले होते. यांनतर राज ठाकरे यांनी फोन करून वसंत मोरेंना आज शिवतीर्थावर (shivtirth) भेटण्यासाठी बोलावलं आहे. राज ठाकरेंना भेटायला जाण्याआधी मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि पक्षावर मी नाराज नाही. त्यांना (राज ठाकरेंना) भेटून माझं समाधान होईल, असं मनसेनेचे पुण्यातील मावळते शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. वसंत मोरे हे आज सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याहून मुंबईसाठी (mumbai) रवाना झाले आहेत. मोरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. ते शिवतीर्था’वर दाखल झाले आहेत.
“राज ठाकरेंनी मला मेसेज केला भेटायला ये. मी आज त्यांना भेटायला जात आहे. तसेच मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी राज ठाकरेंसोबत आणि पक्षासोबत आहे. मी माझं म्हणण मांडणार आहे,” असं वसंत मोरे यांनी राज यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.