ऑनलाईन टीम/तरुण भारत
सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम गोविल (Tabassum Govil) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.
तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असे होशांग यांनी म्हटले.
१९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दुरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचलन केले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्यांनी नर्गिस चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर बैजू बावरा चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले