Vetye Sonurli main road work incomplete; representation to construction department
वेत्ये सोनुर्ली मुख्य रस्त्याचे अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी वेत्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह सदस्यांकडून करण्यात आली याबाबतचे निवेदन त्यांनी बांधकामचे कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे सादर केले.
वेत्ये गावात जाणारा वेत्ये सोनुर्ली हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी नव्याने मंजूर झाला असून याचे काम गतवर्षी सुरु करण्यात आले होते परंतु संबधित ठेकेदाराने हा रस्ता ठिकठिकाणी नादुरुस्त झाला आहे. खडिकरण उकडून खड्डे निर्माण झाल्याने येथून वाहन चालवणे ही धोकादायक बनला आहे एकूणच बांधकाम विभागाच्या गलथान संदर्भात ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे. सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे यासाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गावडे, राजन आंबेकर, शेखर खांबल, आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधले त्यावेळी चव्हाण यांनी सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना आपण संबधित ठेकेदाराला करु, असे आश्वासन दिले.
न्हावेली / वार्ताहर