बेंगळूर \ ऑनलाईन टीम
बेळगावमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. या घोड्याचाच मृत्यू झाला असून घोड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजारों नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीत कोरोनाचे नियमांचा फज्जा उडाल्याचंही दिसून आलं.
कर्नाटकमध्ये गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. या घोड्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गावातील शेकडो नागरिक उपस्थित राहिल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. आता, अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नागरिकांच्या तोंडाला मास्क दिसत नाहीत. कोरोनाच्या कोणत्याच नियमाचे पालन करण्यात आलेले नाही. कोन्नूर गाव आणि मरडीमठ 14 दिवस सीलडाऊन केले आहे. दैवी घोडाच्या अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे.