कुडाळ –
मांडकुली येथील ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव 6 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम, नंतर केळी – नारळ ठेवणे, रात्री 11 वाजता श्री ची पालखी मिरवणूक व त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. या जत्रोत्सवाला उपस्थीत राहण्याचे आवाहन श्री देव लिंगेश्वर पंचायतन सल्लागार उपसमिती ,समस्त मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.