लिमा
दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये माजी अध्यक्ष पेड्रो कास्तिला यांचे समर्थक आणि सुरक्षा दलांदरम्यान मंगळवारी हिंसक झटापट झाली आहे. या हिंसेत आतापर्यंत 17 जण मारले गेले आहेत. तर 73 जण जखमी झाले असून यात अनेक महिलांचा समावेश आहे. 3.37 कोटी लोकसंख्या असलेल्या पेरूमध्ये राजकीय संघर्ष नवा नाही. सुमारे 3 वर्षांपासून येथील संसद अन् अध्यक्षांदरम्यान तणावाची स्थिती आहे. या तणावामुळे अनेकदा या देशात हिंसा झाली असली तरीही पहिल्यांदाच इतके लोक मारले गेले आहेत. नव्या अध्यक्ष डीना बोलुर्ते लवकरच आणीबाणी लागू करणार असल्याचे मानले जात आहे.