ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ खरा आहे. तो मार्फ केलेला नाही, असे वृत्त गुन्हे शाखेतील सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.
काही दिवसांपूर्वीच सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने समोर आणला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप केले होते. विधानसभेतही याचे पडसाद उमटले होते. या व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस सूत्रांनी सोमय्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नाही. परंतु हा आक्षेपार्ह व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.