वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ छोटी मालिका खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयावेळी भारतीय क्रिकेट संघाचे संचालकपद बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख तसेच माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपविण्याचे संकेत मिळाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात टी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात भारतीय संघ इंग्लंडबरोबर एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या कसोटीतील मालिकेतील एक सामना रद्द करण्यात आला होता, तो आता इंग्लंडमध्ये खेळविला जाईल. भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱयाला 26 जूनपासून प्रारंभ होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 1 जुलैला एजबॅस्टन मैदानावर सुरू होईल. याच कालावधीत भारताचे दोन संघ विदेश दौऱयावर जाणार असल्याने लक्ष्मणला संचालकपद दिले जाणार आहे. भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडला जाणाऱया भारतीय कसोटी संघाबरोबर राहतील.