पिंपरी / प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप झाला. त्याचे धक्के पिंपरी -चिंचवडलाही बसण्याची शक्मयता आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी मानली जाते. त्यातच पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे सुद्धा अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल ‘स्वीच ऑफ’ लागत होता. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱयांची भूमिका वेट अँड वॉच अशी दिसून येत आहे.
रविवारी (दि. 2) राज्याच्या राजकारणात मोठय़ा राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपाचे धक्के पिंपरी – चिंचवडलाही बसणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यात मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यामुळे एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे हे दोन्ही पक्ष शहरात आता गळय़ात गळे घालताना दिसू शकतात.
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी मानली जाते. शहरात अजित पवार यांच्या गटाचीच राष्ट्रवादी आहे. अजित पवार जातील तिकडे पिंपरी – चिंचवडमधील राष्ट्रवादी जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदधिकाऱयांना भाजपसोबत जुळवून घ्यावे लागणार आहे.
शपथविधीवेळी अजितदादांचे कट्टर समर्थक असलेले पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे उपस्थित होते. सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबत असलेले बनसोडे यावेळी देखील त्यांच्यासोबत आहेत. पिंपरी -चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
बसला आहे. 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीवेळी देखील बनसोडे हे शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळचे आमदार सुनील शेळके हे दोघेही शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे दोघेही पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते द्धिधा मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ लागत होता. इतर पदाधिकाऱयांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.