Weight Loss After Delivery : गर्भधारणेनंतर बहुतेक स्त्रिया वाढलेल्या वजनामुळे त्रासलेल्या असतात. प्रसूतीनंतर आहार, विश्रांती यामुळे वजन जादा वाढते. यासाठी वेळीच काळजी काही गोष्टींची काळजी घेतल्यास वजन सहज कमी करता येऊ शकते. यासाठी आज आम्ही तुम्हाला ६ टिप्स देणार आहोत. याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.
गर्भधारणेनंतर दररोज मेथीचे पाणी प्यावे. हे हार्मोन्स संतुलित करण्यास आणि पोट कमी करण्यास मदत करेल. १ चमचे मेथी दाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी थोडे गरम करून प्यावे.
प्रसूतीनंतर सुमारे 6 महिने फक्त कोमट पाणी प्या. गरम पाण्याने पोट कमी होते आणि शरीरावर चरबी जमा होत नाही.
गर्भधारणेनंतर बाळाला आईच दूध दिल्यास वजन कमी करणे सोपे होते. त्यामुळे शरीरातील फॅट सेल्स आणि कॅलरीज दूधात वापरल्या जातात आणि वजन कमी होऊ लागते.
अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध ग्रीन टी वजन कमी करण्यासही मदत करते. प्रसूतीनंतर ग्रीन टी प्या. ग्रीन टी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते.
पोटाला सूती कापड किंवा बेल्टने बांधा
प्रसूतीनंतर आपली आजी पोटाला बांधायला सांगते. आपण दुर्लक्ष करतो. याचा तोटा आपले पोट सुटते. तसे होवू नये म्हणून आपले पोट सुती कापडाने किंवा औषधी बेल्टने बांधा. हे पोट सामान्य आकारात येण्यास मदत होते.
गर्भधारणेनंतर दालचिनी आणि लवंग टाकून पाणी प्यायल्याने पोट कमी होते. 2-3 लवंगा आणि 1/2 चमचे दालचिनी पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर प्या.
Disclaimer: हि माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.