गव्हाच्या दरात वाढ : वाढत्या महागाईचा चटका
प्रतिनिधी / बेळगाव
इंधन दरवाढीपाठोपाठ गॅस, तेल, कडधान्य, डाळी आणि आता गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे. गव्हाचे दर क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे महागाईचा चटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधीच महागाई त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर हळूहळू वाढत चालल्याने जगणे कठीण झाले आहे.
रशिया-युपेन युद्धामुळे जागतिक पातळीवर गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दर भरमसाट वाढले आहेत. दैनंदिन आहारामध्ये चपातीचा अधिक वापर होतो. त्यामुळे आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तेल, कडधान्य आणि किराणा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. आता गव्हाचे दर भडकल्याने गहू कसा खरेदी करावा, अशी चिंता गृहिणींना लागली आहे.
दोन महिन्यांपासून गव्हाचे दर हळूहळू वाढत जाऊन 3350 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. सर्वसामान्यांची भूक भागविणारा गहू महागल्याने दैनंदिन गरजा भागविताना अडचणी वाढल्या आहेत. दैनंदिन साहित्याच्या दरात वाढ होत असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे.
अनियमित पावसामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर वाढले आहेत. अतिप्रमाणात झालेल्या पावसामुळे गहू पिकाला फटका बसला आहे. उत्पादनात घट होऊन दर भडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना गव्हासाठी आता जादा पैसे मोजावे लागत आहेत.