सावंतवाडी / प्रतिनिधी
डेगवे येथे स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरे पट्टे मारले आहेत. रविवारी दुपारी हे पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत डेगवेत चार ठिकाणी स्पीड ब्रेकर्स आहेत. स्पीड बेकर वाहन चालकांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे वारंवार अपघात होते त्यात अनेक वाहन चालक स्पीड ब्रेकर्सचा अंदाज न आल्याने जखमी झाले होते त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर्स दर्शविणारे सुचना फलक किवा पांढरे पट्टे मारावी अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख विजय देसाई यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन देगवे येथे रविवारी स्पीड बेकर च्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत .ते आता वाहनचालकांच्या नजरेस भरून अपघात कमी होणार आहेत असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे लवकरच या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.