ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने एका नवीन रॅपिड अँटिजेन किटला मंजुरी दिली आहे. हे टेस्ट किट WHO 133 देशांना वितरित करणार आहे. डब्लूएचओचे प्रमुख टैड्रॉस एडहेनॉम घेबरेयेसस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
घेबरेयेसस म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना आपल्या भागीदारांसोबत स्वस्त कोरोना टेस्ट किट बनवत आहे. सहा महिन्यांच्या आत 12 कोटी टेस्ट किट बनवण्यात येणार असून, 133 देशांना ते वितरित केले जातील. स्वस्त कोरोना टेस्ट किटमुळे अधिकाधिक चाचण्या होतील. त्यामुळे बाधित रुग्णांवर लवकर उपचार करता येतील.
हे कोरोना किट 5 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 400 रुपयांना मिळेल. या किटमुळे 15 ते 20 मिनिटात रुग्णांचा रिपोर्ट समोर येईल. त्यामुळे कोरोनाचे वाढते संक्रमण रोखता येईल.