पतीकडून खुनाची कबुली. पैशांसाठी दररोज होत होती भांडणे. तीन वषीय मुलीची अपना घरमध्ये रवानगी. 24 तासांच्या आत संशयिताचा लावला ठाव
डिचोली/प्रतिनिधी
वाठादेव सर्वण येथील एका गेल्या शुक्र. दि. 13 मे रोजी उघडकीस आलेल्या बिहारी महिलेच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सदर महिलेचा पती बळीराम अनंत कुमार महातो या बिहारी युवकाने आपणच आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली डिचोली पोलिसांसमोर दिली आहे. या दांम्पत्यामध्ये विविध कारणांवरून भांडणे होतच होती. खून झालेल्या रात्रीही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बळीरामने रागाच्या भरात गळा आवळून पत्नी शोभादेवी कुमार महातो (वय 25) हिचा खून कजला होता. डिचोली पोलिसांनी हि घटना उघडकीस येताच चोवीस तासांच्या आत संशयित आरोपीचा उपअधिक्षक सागर एकोसकर व निरिक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ठाव काढून पथक पाठविण्याची तयारी केली होती.
पती पत्नीमध्ये भांडणे नियमित होत होती
मयत शोभादेवी व संशयित आरोपी पती बळीराम कुमार महातो आपल्या तीन वषीय मुलीसह गेल्या महिनाभरापूर्वी वाठादेव सर्वण येथे एका भाडय़ाच्या खोलीत राहण्यासाठी आले होते. बळीराम हा कामाला नियमित जात नव्हता. तसेच कामातून मिळालेल्या पैशाची उधळपट्टी करायचा. हि बाब पत्नी शोभादेवी यांना आवडत नव्हती. संसाराला आवश्यक असलेली रक्कम आपल्याकडे नियमित द्यावी तसेच कामालाही दररोज जावे यासाठी या पती पत्नीमध्ये वाद होतच होते. त्याचेच पर्यावसान भांडणातही होत होते.
नवीन मोबाईल आणल्याने झालेल्या भांडणात गेला पत्नीचा जिव
तसेच बळीराम याला मद्यप्राशनाचे व्यसन होते. याही कारणामुळे त्यांच्यात वाद सुरू असायचा. खून झालेल्या दिवशी म्हणजे बुध. दि. 11 मे रोजी बळीरामने एक नवीन मोबाईल खरेदी केला होता. या मोबाईल खरेदीला पत्नीचा तिव्र विरोध होता. या प्रकरणावरून रात्री या दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे बळीरामने सदर मोबाईल बंदच ठेवला. पण पत्नीबरोबर चालूच असलेल्या भांडणात रागाच्या भरात बळीरामने बुधवारी रात्री तिचा गळा दाबून जिव घेतला.
झांसी येथून पळण्याच्या इराद्यात असतानाच घेतले हैते ताब्यात
हि बाब कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वी बळीराम याने आपल्या तीन वषीय लहान मुलीला बरोबर घेऊन दुसऱया दिवशी म्हणजे गुरू. दि. 12 मे रोजी सकाळी 6.30 वा. च्या सुमारास खोलीला बाहेरून कुलूप लावले. त्याचवेळी त्याला शेजारील एका महिलेने हटकून विचारले असता आपण ब
फिरायरा जात असल्याचे सांगून त्याने या जागेवरून पोबारा केला. डिचोलीहून थेट थिवी रेल्वे स्थानक गाठत त्याने मुंबईला जाणारी रेल्वे धरली व तो मुंबईला दाखल झाला. तर मुंबईहून मंगला एक्स्प्रेस या रेल्वेने तो उत्तर प्रदेश येथे झांसी येथील विरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकावर दाखल झाला. या रेल्वे स्थानकावरून बिहारची रेल्वे पकडून बिहार येथे गावात जाण्याच्या इराद्यात असतानाच त्याला डिचोली पोलिसांच्या झांसी येथे गेलेल्या पथकाने ताब्यात घेतले.
खोलीला बाहेरून कुलूप ठोकून फरार झाल्याने थेट संशय पतीवर होता
हे प्रकरण शुक्र. दि. 13 मे रोजी उघडकीस आले होते. वाठादेव येथे कुलूपबंद असलेल्या खोलीतून मांजराचा मोठमोठय़ाने ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील एका लहान मुलाने कडीच्या छीद्रातून खोलीत पाहिले असता त्याला महिला पडलेल्या अवस्थेत दिसली. त्याने सदर बाब घरच्यांना सांगितल्यानंतर एका इसमाने छीद्रातून पाहिले आणि थेट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच येऊन खोलीचे कुलूप तोडून दरवाजा उघडल्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणानंतर पती खोलीला बाहेरून कुलूप लावून फरार झाल्याने थेट त्याच्यावरच संशय होता.
भावाच्या मोबाईलमुळे बळीरामचा लागला ठाव
बळीराम सदर खून करून आपल्या मुलीसह मुंबईत गेला. तेथून त्याने मंगला एक्स्प्रेस हि रेल्वे पकडली. त्याच रेल्वेने त्याचा भाऊही प्रवास करून नंतर बिहारला जाणार होता. त्यामुळे त्याच्यासोबत जाण्याचा त्याने विचार.करून आपल्या फोनवरून भावाला फोन केला. भाऊ मिळताच बळीरामने आपला मोबाईल बंद ठेवला होता. परंतु त्याने आपल्या मोबाईलवरून केलेल्या फोनची माहिती घेऊन पोलिसांनी पडताळणी केली असता फोन केलेला व्यक्ती त्याचा भाऊ असल्याचे समजले. भावाला केलेला कॉलही आढळून आला. व सदर मोबाईल लोकेशन उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असताना मिळत असल्याने पोलिसांनी सदर मोबाईल लोकेशनचा पाठलाग केला. त्यासाठी डिचोली पोलीस उपनिरीक्षक अनिल पोलेकर, हवालदार विजय मांदेकर व कोन्स्ट?बल रणजित बाले यांचे पथक झांसी येथे पाठविण्यात आले. या पथकाने बळीरामचा झांसी येथे ठावठिकाणा मिळवत तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला झांसी रेल्वे स्थानकावरच बिहार येथे जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.
संशयित आरोपीला शोधून काढण्याचे पोलिसांसमोर होते आव्हान
खून झालेल्या महिलेची कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. तसेच खून केलेल्या पतीचीही माहिती किंवा फोटोही नव्हता. केवळ तो मोबाईल फोन घ्यायला गेलेल्या एका दुकानावरील सिसीटिव्ही फुटेजमधील त्याची छबी पोलिसांकडे होती. अशा परिस्थितीत तो दोन दिवसांपूर्वीच गोव्यातून गायब झाला होता. त्यामुळे त्याची माहिती मिळवून त्याला शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र उपअधिक्षक सागर एकोसकर व निरिक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिसांनी चांगली कामगिरी बजावत संशयिताच्या मुसक्मया आवळल्या. या खूनाच्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अनिल पोलेकर, प्रजित मांदेकर, विशाल मांदेकर, करिष्मा परूळेकर व इतर पोलीस कर्मचाऱयांनी चांगली कामगिरी बजावली.