पुणे / प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली, तर आम्ही त्यांचा पराभव करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, असा ठाम निर्धार काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी पत्राद्वारे केली. संजय काकडे यांच्या या भूमिकेनंतर धंगेकर म्हणाले, आम्ही पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींचे पुण्यात स्वागत करू. पण त्यांचा गत 9 वर्षांतील कारभार पाहता, देशातील सर्वच जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मोदी पुण्यातून उभे राहिले तर त्यांचा पराभव करण्यास काँग्रेस सज्ज आहे.
धंगेकर करणार मोदींशी दोनहात
मुंबईतील इंडियाच्या बैठकीत पुण्याची लोकसभा कोण लढवणार हे ठरेल. त्यात पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तर मी त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. धंगेकर यांच्या या विधानाने ते निवडणुकीत मोदींशी दोनहात करण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते.