वृत्तसंस्था/ रांची
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या महिलांच्या 2024 हॉकी लीग फेज-1 टप्प्यातील विविध सामन्यात बंगाल आणि ओडिशा यांनी प्रतिस्पर्धांवर विजय नोंदविले.
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पहिल्या सामन्यात बंगालने मिझोरामचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल 18 व्या मिनिटाला बंगालच्या शिवानी कुमारीने केला. दुसऱ्या सामन्यात ओडिशाने महाराष्ट्राचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. या सामन्यात ओडिशातर्फे दिपी मोनिका टोपोने 23 व्या मिनिटाला तर करूणा मिंझने 55 व्या मिनिटाला गोल केले. महाराष्ट्रातर्फे एकमेव गोल 51 व्या मिनिटाला सुनीता कुमारीने केला.