तीन जणींचा घटनास्थळीच मृत्यू
वृत्तसंस्था/ पुड्डूचेरी
पुड्डूचेरी येथील कोट्टाकपुरमनजीक किलपुथुपट्टूमध्ये एक मोठी रस्ते दुर्घटना घडली आहे. येथे रविवारी पहाटे एका भरधाव कारने तीन महिलांना चिरडले आहे. या तिन्ही महिला मासेविक्रीची काम करायच्या. लक्ष्मी (48 वर्षे), गोविंदम्मल (47 वर्षे) आणि गेंगाम्मल (45 वर्षे) अशी या मृत महिलांची नावे आहेत. तिन्ही महिला पुडुकुप्पम येथील रहिवासी होत्या.
6 महिला बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करत असताना चेन्नईहून पुड्डूचेरी येथे जात असलेल्या एका भरधाव कारने त्यांना चिरडले. 6 महिलांपैकी तीनजणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारमधून प्रवास करणारे 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चेन्नईच्या नुंगमबक्कम येथील रहिवासी जी. विग्नेशरणला अटक केली आहे. निष्काळजीपणाने वाहन चालविणे आणि दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.