वृत्तसंस्था/ लंडन
महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्याची घोषणा फिफाने केली आहे. आता या बक्षीस रकमेत 300 टक्क्यापेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फिफाच्या आगामी होणाऱ्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला आता आता 150 दशलक्ष डॉलर्स (15 कोटी ऊपये) मिळणार आहेत.
फिफाने अलीकडेच झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेतला आहे. 2019 साली झालेल्या फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत 24 संघांचा समावेश होता. संघांच्या पूर्वतयारीसाठी आणि विविध क्लबमधील फुटबॉलपटूंना देण्यात येणाऱ्या मानधन रक्कमेसाठी पहिल्यांदाच 32 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतून फिफाकडे सुमारे 152 दशलक्ष डॉलर्सचा निधी उपलब्ध झाला होता. 2015 साली देण्यात आलेल्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्याच्या रकमेच्या तुलनेत आता यावेळी 10 पटीने अधिक बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे.
फिफाने फुटबॉलपटूंसाठी सुमारे 110 दशलक्ष डॉलर्सची रक्कम राखीव ठेवली आहे. रवांडा येथे गुरुवारी झालेल्या फिफाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये विद्यमान अध्यक्ष गियानी इन्फन्टिनो यांची अध्यक्षपदासाठी फेरनियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी 2027 अखेर राहिल.