फोंडा नगरपालिकेजवळील चेंबरमध्ये घटना :,सात वर्षे रखडणाऱया प्रकल्पात सात महिन्यात दोघांचा बळी
प्रतिनिधी /फोंडा
फेंडा नगरपालीकाजळील मलनिस्सारण चेंबरमध्ये काम करताना वीज तारांच्या संपर्कात आल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. आलमगीर जुल्लार रेहमान (19, रा. बांदोडा मूळ पं. बंगाल) असे त्याचे नाव आहे. सदर घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालीकेसमोरील मुख्य रस्त्यावरील मलनिस्सारण चेंबरचे काम सुरू असताना येथे काम करणाऱया कामगाराबरोबर आलेल्या त्याचा मित्र जीव तारांचे पावर बॉक्सच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. फोंडा येथील उपजिल्हा इस्तिळात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. शवचिकित्सा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिली.
सात वर्षे रखडणाऱया प्रकल्पामुळे सात महिन्यात घेतले दोन बळी
फोंडा शहर परिसरात मागील सात वर्षापासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असून अजूनपर्यंत पाईपलाईनची जोडणीचे काम पुर्णत्वास आलेले नाही. सात महिन्यात दोघा कामागाराचे मलनिस्सारण कामामुळे बळी गेलेले आहे. 12 मे रोजी कपिलेश्वरी फेंडा येथील अंडरपास जन्क्शनजवळील मलनिस्सारण चेंबरमध्ये पाणी उपसण्याचे काम करणाऱया एका कामगाराचा आठ मिटर खोल चेंबरात गुदमरल्यानंतर पाण्य़ात बुडून मृत्यू झाला होता. तसेच त्याचा साथी कामगार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर याप्रकरणी मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामगारांना सुरक्षा उपकरणाशिवाय काम करायला लावल्याप्रकरणी जबाबदार धरून प्रकल्पाचे अधिकारी, अभियंता व कंत्राटदारासह पाचजणावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतरही असेच प्रकार सुरू असल्याचे शनिवारी घडलेल्या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. पुनः बेपर्वा मलनिस्सारण कामामुळे अन्य एका युवा कामगाराचा बळी गेलेला आहे.
मलनिस्सारण प्रकल्पाच्या सुरक्षेअभावी कामगाराचा मृत्यू
मागील सात वर्षापासून फोंडय़ात मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबर, वाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदण्याचे काम सुरू असते, यावेळी देखरेखेसाठी संबंधित कामाचा कंत्राटदारही दिसत नसून खात्याचे अभियंतेही आढळत नाही. या कामगारांचे काम रामभरोसे सुरू असते. मलनिस्सारण चेंबरमुळे फोंडयात अनेक अपघाताच्या घटनामुळे जीव गमावलेले आहेत. तरीही संबंधित खाते सुरक्षेचे उपाययोजना धाब्यावर बसवून निवांत काम करत असते. कामगाराचा मृत्यू ही घटनास्थळावर नसलेल्या सुरक्षिततेच्या निष्काळजीपणे घडल्याचे येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे. सदर घटनेची कोणालाही सुगावा लागू न देण्याची व्यवस्थित आखणी कंत्राटदार व पोलिसांनी केली होती. चेंबरमजवळ एक कामगार वीजेच्या धक्याने मृत झाल्याची बातमी गावभर पसरल्यानंतर फोंडा पांलिसांसही मलनिस्सारण प्रकल्पाच्या अभियंत्याची धावपळ उढाली होती. बेजबाबदार कृतीमुळे एका कामगाराला जीव गमावावा लागल्याप्रकरणी कोणावर गुन्हा दाखल करतात यावर सर्वाची लक्ष राहून राहिले आहे.